टिळकनगर विद्यामंदिरात विठू माऊलीचा जयघोष
डोंबिवली, दि. २९
आषाढी एकादशीनिमित्त टिळकनगर विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडीचे आयोजन केले होते. दिंडीत झालेल्या विठू माऊलीच्या जयघोषात सारे वातावरण भक्तीमय झाले.
दिंडी,पालखी सोहळा, फुगडी, रिंगण, हरी नामाचा गजर शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात करण्यात आला.
पारंपरिक वेशभूषा, विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर आणि भावंडे आणि काही संतांच्या वेशभूषेत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
संस्था,शाळेचे पदाधिकारी आणि शिक्षकही या दिंडीत सहभागी झाले होते.
—–
