ठळक बातम्या

मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; महापालिका प्रशासन सज्ज

मुंबई, दि. २८
मुंबईत पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका आयुक्त/प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

आपापल्या विभाग कार्यालयाच्या हद्दीतील पाणी साचण्याची शक्यता असलेल्या सखलभागांची पाहणी करावी, तसेच आवश्यकता भासल्यास तातडीच्या उपाययोजना कराव्या, पाणी उपसा करणारे पंप चालू स्थितीत आहेत की नाही याची खातरजमा करावी. सब-वेची पाहणी करावी, अशा सूचना चहेल यांनी दिल्या आहेत.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *