राज्यघटनेचे संरक्षण करायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही- मुकुल वासनिक
मुंबई, दि. २०
गेल्या काही वर्षात केंद्रातील सरकारने राज्यघटनेला तिलांजली देण्याचे काम केले आहे. आता राज्यघटनेचे संरक्षण करायचे असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी येथे केले. टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या कार्यकारिणी बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
‘हिंदु राष्ट्रा’सह हिंदुहिताच्या मागण्या पूर्ण करणार्यांनाच हिंदूंचा पाठिंबा- डॉ. चारुदत्त पिंगळे,
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना तयार झाली पण या राज्यघटनेचे बीज स्वातंत्र्यापूर्वीच कराची अधिवेशनात पेरले गेले. स्वातत्र्यानंतर देश कसा असेल, कोणासाठी स्वांतत्र्य हवे, याचा विचार झाला तेव्हा सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा देश उभा करण्याचा विचार झाला आणि त्यातच राज्यघटनेचे बीज रोवले गेले,असेही वासनिक यांनी सांगितले.
काश्मिरमधील नरसंहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळेच भारतभरात ‘काश्मीर पॅटर्न’ – राहुल कौल
या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, २०१४ नंतर देशात व राज्यात हिंदुत्ववादी व्यवस्थेने डोके वर काढले. शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराच्या भूमीत समाजात धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम सुरु आहे पण जनतेने भाजपाच्या या षडयंत्रला बळी पडू नये.
जम्मूतून हिंदूंना हाकलून देण्यासाठीच कठुआ बलात्कार प्रकरणाचे षड्यंत्र- प्रा. मधु किश्वर
आपल्यासमोरची लढाई मोठी आहे, मागासवर्गीयांचे प्रश्न प्रलंबित आहेत, मागास वर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, घरांचे प्रश्न यावर सरकार निर्णय घेत नाही, केवळ आश्वासन देत आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या. ‘संविधान बचाव, देश बचाव’ हा संदेश घेऊन लवकरच दिक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी संविधान गौरव यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेदम्यान प्रत्येक जिल्ह्यात संविधानाच्या दोन हजार प्रतींचे वाटप केले जाणार आहे, असे एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी सांगितले.
