ठळक बातम्या

महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६
महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यावर भर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिंधुदुर्ग येथे केले. सावंतवाडी शहर व सावंतवाडी मतदार संघातील विविध ११० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उदघाटन आणि भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची नियुक्ती

केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, ग्रामविकास व क्रीडामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह
कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रातांधिकारी प्रशांत पानवेकर आदी यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक प्रकल्प राज्यात सुरु आहेत. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता

महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून या राज्य शासनाच्या कालावधीत १ लाख १४ हजार कोटी परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्ता केला.

किती मेट्रीक गाळ काढला यापेक्षा मुंबईत कुठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणाचा गतीमान विकास होण्यासाठी दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे राणे यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केसरकर यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *