ठळक बातम्या

खेळाडूंच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी भाजप खासदार बृजभूषणला अटक झाली पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, दि. २ जून
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. खासदार बृजभूषण सिंहला तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चव्हाण यांनी ही मागणी केली.

जेजे रुग्णालयातील डॉक्टरांचे राजीनामे आणि निवासी डॉक्टरांच्या संपात तातडीने तोडगा काढावा – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असून याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक एफआयआर पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. असे असतानाही भाजप खासदार बृजभूषणला अटक होत नाही. देशाची जगात बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प आहेत हे त्याहून गंभीर असल्याचे चव्हाण म्हणाले.

कडोंमपातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत

आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने दोन दिवसांची आढावा बैठक आयोजित केली असून सर्व ४८ मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

रायगड किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ही जागा वाटपाची बैठक नसून फक्त स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी यांची मते अजमावली जात आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *