ठळक बातम्या

जेजे रुग्णालयातील डॉक्टरांचे राजीनामे आणि निवासी डॉक्टरांच्या संपात तातडीने तोडगा काढावा – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

मुंबई, दि. २
मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभागातील नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेले सामुहिक राजीनामे, रुग्णालयातील ‘मार्ड’च्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ सर्वमान्य तोडगा काढावा आणि रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या – बहुचर्चित तुकाराम मुंढे आता मराठी भाषा विभागाचे सचिव

मुंबईतील जेजे रुग्णालयात सुरु असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादामुळे तसेच मार्डचे ७५०निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेल्याने रुग्णसेवा ठप्प पडली असून रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरु आहेत.

रायगड किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्यामुळे या विषयात लक्ष घालून हा वाद मिटवावा, अशी विनंती अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यकडे एका पत्राद्वारे केली आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *