ठळक बातम्या

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देणार

मुंबई दि.२८ :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी – रवींद्र चव्हाण

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘शतजन्म शोधिताना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्य न्यायमूर्ती फक्त तीन दिवसांचे!

केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री दिपक केसरकर यांचेही भाषण झाले.प्रधान सचिव खारगे यांनी प्रास्ताविक केले. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *