ठळक बातम्या

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या वेगावर आता नियंत्रण

प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू

मुंबई दि.२८ :- मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम – एचटीएमएस) अंतर्गत कामे सुरू झाली आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण केली जाणार असून या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येणार आहे.

विस्टाडोम डब्यांमुळे मध्य रेल्वेला ८ कोटींहून अधिक महसूल

संपूर्ण मार्गावर ९३ ठिकाणी ३७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. परिणामी अति वेगाने वाहन चालविणे, मार्गिका तोडणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणे सोपे होणार आहे. द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने एचटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार दर चार किलोमीटर अंतरावर वेग तपासणारी यंत्रणा, मार्गिका तोडली जात आहे किंवा कसे, याबाबतची यंत्रणा सुरू केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *