ठळक बातम्या

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी कडोंमपा परिवहन सेवेची बससेवा उपलब्ध

मुंबई दि.१५ :- नवी मुंबई, खारघर येथे उद्या (रविवार) राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने मनुष्यबळासह कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेदुटणे गावाजवळ जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

खारघर येथील कार्पोरेट पार्क येथे रेवदंडा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय नारायण ऊर्फ आप्पा धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लाखो अनुयायी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई महापालिका, सिडको, स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे. त्यामुळे कडोंमपाच्या ५० बस अनुयायांच्या सोयीसाठी कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय कंडोमपा महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *