मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.१५ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर उद्या (रविवारी) सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत माटुंगा- मुलुंड जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा हार्बर रेल्वेवरील उद्याचा मेगा ब्लॉक रद्द
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ यावेळेत सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर यांचा ‘बेस्ट’च्या दोन बसमध्ये चेंगरून मृत्यू
ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर आणि नंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येणार आहेत.
