महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा हार्बर रेल्वेवरील उद्याचा मेगा ब्लॉक रद्द
मुंबई दि.१५ :- राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा उद्या (रविवारी) आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर यांचा ‘बेस्ट’च्या दोन बसमध्ये चेंगरून मृत्यू
खारघर येथे होणा-या या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन रविवारी हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर १६ एप्रिल रोजी होणारा मेगा ब्लॉक मध्य रेल्वेने रद्द केला आहे.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना हार्बर रेल्वेने व्यवस्थित प्रवास करता येईल. सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी या सहकार्याबद्दल मध्य रेल्वेचे आभार मानले आहेत.
