ठळक बातम्या

बिहार शासनाच्या जातीनिहाय जनगणनेचा अभ्यास करून महाराष्ट्राबाबत निर्णय- उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई दि.२५ :- केंद्र सरकारने राज्यांना जातीनिहाय जनगणना करावी असे सांगितले आहे. बिहार सरकार सध्या ओबीसी जातीनिहाय जनगणना करत असून त्याचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जातीनिहाय जनगणनेबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

केईएम रुग्णालयात ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ प्रकल्प सुरू

ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. बिहार राज्य सरकार सध्या जातनिहाय जनगणना करत आहे. या जनगणनेचे काम पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन काही प्रतिनिधी तिथे पाठविणार आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब लोकांसाठीही योजना तयार केली जाणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *