ठळक बातम्या

टँकरच्या पाण्यात होणा-या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल- उदय सामंत

मुंबई दि.२४ :- मुंबईतील टँकरच्या पाण्यात होत असलेल्या गैरव्यवहाराची महापालिका अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील पाण्याची लक्षवेधी सूचना उपस्थितीत केली होती. त्यावर उत्तर देताना सामंत बोलत होते.

सहकारी गृहनिर्माण संस्थांना आकारण्यात येणारा अकृषिक कर रद्द होण्याची शक्यता

मुंबईत मुलुंड आणि वांद्रे पश्चिम येथे प्रायोगिक तत्त्वावर २४ × ७ पाण्याचा प्रकल्प राबविण्यात आला. हे दोन्ही प्रकल्प अयशस्वी ठरले. यासाठी १५० कोटी रुपये सल्लागारांना तर २५० कोटी कंत्राटदाराला देण्यात आले. जवळपास ५०० कोटी रूपये खर्च करुनही हा प्रकल्प महापालिका यशस्वी करु शकली नाही, असे शेलार यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानावरून विधानसभेत गोंधळ, कामकाज काही वेळासाठी तहकूब

मुंबईत १९ हजार विहिरी असून यामध्ये १२ हजार ५०० बोअरवेल आहेत. केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या पाहणीत एका बोअरवेल मधून ८० कोटींची चोरी टँकर मधून होते. मुंबईत १० हजार कोटीचा पाण्याचा घोटाळा टँकर मार्फत केला जातो. याची चौकशी करणार का? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थितीत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *