नववर्ष स्वागत यात्रेसाठी ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण
डोंबिवली दि.१३ :- श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित यंदाची नववर्ष स्वागत यात्रा (२२ मार्च) ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेवर आधारित आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीचे व्यापक रूप चित्ररथ, दिंड्या, देखावे या माध्यमातून सादर केले जाणार आहे. नववर्ष स्वागत यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
दहिसर पूर्व येथील आनंदवन उद्यानात महापालिकेतर्फे खुले वाचनालय
निसर्ग, पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, कचरा मुक्त अभियान, असे सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांबरोबर पंचमहाभुतांची दिंडी, शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या संकल्पनेतील देखावे नववर्ष स्वागत यात्रेत असणार आहेत. स्वागत यात्रेचे यंदा पंचवीसावे वर्ष आहे. स्वागत यात्रा पूर्वसंध्या कार्यक्रमांची सुरुवात स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या उपस्थितीत होणार आहे.
जुन्या निवृत्तवेतन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक उद्यापासून संपावर
स्वागत यात्रेनिमित्त आठवडाभर श्रीराम नाम जप यज्ञ, सामुदायिक गीता पठण, अथर्वशीर्ष पठण, दीपोत्सव, विविध प्रांतांमधील महिलांची भजने, पाककला स्पर्धा, गीत रामायण कार्यक्रम, महारांगोळी, दुचाकी फेरी, प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरील नृत्याविष्कार, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त व्याख्यान इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
