Thursday, August 20, 2026
Latest:
राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आधी बाप पळवायचा आता मुलेही पळवायला लागला- खासदार संजय राऊत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.१४ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आधी बाप पळवायचा, आता मुलेही पळवायला लागला आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यावर राऊत बोलत होते.

नववर्ष स्वागत यात्रेसाठी ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण

उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाईं यांच्यावर काही आरोप केले होते. तसेच त्यांच्या चौकशीचेही आम्ही आदेश दिले असल्याचे सामंत, म्हणाले होते, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. त्यांनी आता भूषण देसाई यांना भाजपाच्या वाॅशिंगमशीनमध्ये टाकून आपल्या बाजुला बसविले आहे. उदय सामंत यांच्या आरोपांचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करून राऊत म्हणाले, त्यांची ही मेगा भरती सुरु आहे, मात्र ती कुचकामी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *