ठळक बातम्या

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

मुंबई दि.०६ :- राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. परस्पर प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व देशबांधवांमध्ये असलेली नात्यांची वीण अधिक घट्ट करो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. होळी आणि रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल सर्वांनी जागरुक राहावे, असे आवाहनही राज्यपाल बैस यांनी केले आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये

पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

होळी पर्यावरणपूरक पद्धतीने आणि धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले आहे. आयुष्यात परस्पर स्नेह-प्रेमांच्या रंगांची बहार निर्माण होऊन सणांच्या उत्साहातून सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *