सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन
मुंबई दि.०६ :- सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादीत न राहता कला-क्रीडा गुणांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करावा असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी केले.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समालोचक वि. वि. करमरकर यांचे निधन
बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य २०२३’ या कला आणि क्रीडा आविष्कारांचा सांस्कृतिक सोहळा रविवारी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलातील सरदार वल्लभाई पटेल डोम स्टेडियम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
‘म्हाडा’ कोकण मंडळाच्या घरांसाठी येत्या १० मे रोजी सोडत; उद्या जाहिरात
या सोहळ्यास शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजहंस सिंह, सहआयुक्त (शिक्षण) (अतिरिक्त कार्यभार) अजित कुंभार, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, अभिनेते प्रसाद ओक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.