Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

ऐन डिसेंबर महिन्यात मुंबईचे तापमान ३४ अंश सेल्सियस

मुंबईतील कमाल तापमान देशातील सर्वाधिक

मुंबई दि.१८ :- गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उकाडा जाणवत आहे. ऐन डिसेंबर महिन्यातील रविवारी मुंबईत ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सलग दोन दिवस मुंबईत देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.

शनिवाररी मुंबईतील कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. शहरातील तापमानातील बदलांमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना सर्दी, खोकला, अंगदुखी असा त्रास सुरु झाला आहे.

डिसेंबर महिन्यात मुंबई शहरातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान १९८७ मध्ये ३८ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले होते. दरम्यान नाताळनंतर किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *