नवी मुंबईत १० जानेवारीला थकीत कर असलेल्या वाहंनाचा लिलाव
नवी मुंबई दि.१८ :- नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून थकीत कर असलेल्या वाहंनाचा लिलाव येत्या १० जानेवारीला करण्यात येणार आहे. मोटार वाहन कर न भरलेली मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांअतर्गत जप्त करण्यात आली असून जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांना थकीत कर भरण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. त्या
नंतरही ज्या वाहनांचा कर भरण्यात आलेला नाही अशा ई ऑक्शन पद्धतीने जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत थकबाकीदारांना कर भरण्याची संधी देण्यात आली आहे. वाहनांचा हा लिलाव सकाळी अकरा वाजता नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या चाचणी मैदानावर होणार आहे.