मुंबई दि.११ :- एप्रिल ते जुलै २०२३ दरम्यान २६ हजारांहून अधिक विनातिकीट आणि अयोग्य तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ८७.११ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
वातानुकूलित लोकलमधील प्रवाशांकडून जुलै महिन्यात १५.८२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर सामान्य लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ६१.२६ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.