ठळक बातम्या

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात डोळे येण्याची साथ

मुंबई दि.११ :- राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘डोळे येण्या’ची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. दहा ऑगस्टपर्यंत राज्यात ३ लाख ५७ हजार २६५ जणांना डोळे आले. मुंबईत २ हजार ८६२ जणांचे डोळे आले आहेत.‌

गेल्या तीन महिन्यांत पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांकडून ८७.११ लाख रुपये दंड वसूल

पालघर – १९७७, रायगड – ८१६, नवी मुंबई – ६९०, ठाणे (मनपा)- ४१४, ठाणे – १८६, कल्याण डोंबिवली महापालिका ५८ अशी डोळे आलेल्या रुग्णांची संख्या आहे. ज्या भागात डोळे येण्याची साथ सुरू आहे तिथे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *