सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न- अधिवक्ता सुभाष झा
मुंबई दि.२८ :- एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न सुरू असून यामुळे देशाची अधोगतीकडे वाटचाल होईल. सरकार आणि समाज यांनी याचा गांभीर्याने विचार करावा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष झा यांनी केले. हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या‘समलैंगिकतेला सर्वोच्च न्यायालयात एवढे महत्त्व का?’ या ऑनलाईन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.
‘बेस्ट’ बसमध्ये ऑडिओ,व्हिडिओ पाहण्यास, इअरफोन आवश्यक
एरवी नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता विषयासाठी न्यायालयाकडे वेळ आहे. कुठले तरी चुकीचे कायदे आणून पती-पत्नीच्या पवित्र विवाहबंधनाला धोका निर्माण केला जात आहे, असेही झा यांनी सांगितले. समलैंगिकता ही रोम आणि ग्रीस देशांकडून आलेली विकृती असून यातूनच एड्स रोग निर्माण झाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भिवंडी तालुक्यातील खलिंग खुर्द गावात पादचारी पूल उभारण्यात येणार
समलैंगिकतेला मान्यता देऊन पवित्र विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्थेवर चौफेर आघात केले जात आहेत. सध्याच्या भरकटलेल्या युवा पिढीला समलैंगिकतेच्या माध्यमातून दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाने या अनैसर्गिक आणि चुकीच्या गोष्टींविरोधात लढा देण्याची आवश्यकता आहे, असे इतिहास अभ्यासक मीनाक्षी शरण म्हणाल्या.