टिळकनगर बाल मंदिराच्या ‘अमृतपुत्र’ गौरव समारंभात ४३ विद्यार्थ्यांचा गौरव
डोंबिवली दि.०९ :- राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिले असून भारतीय भाषा, कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यात आले आहे, असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्रातील संशोधन अधिकारी व शाळेच्या माजी विद्यार्थिनी श्रुती भालेकर यांनी आज येथे केले. टिळकनगर बाल मंदिराच्या अमृतपुत्र गौरव समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना पंचप्रण प्रतिज्ञा
बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे, अचानक आलेल्या प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे, प्रसंगावधान, निर्णय क्षमता हे गुण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. संस्थेचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी प्रास्ताविक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका विजया निरभवणे यांनी अहवाल वाचन केले.
चित्रपट, रंगभूमी महामंडळाकडून १ कोटी ३४ लाख रुपयांचा लाभांश शासनाला सुपूर्द
शाळेतील बालक वर्ग ते इयत्ता चौथी पर्यंतच्या एकूण ४३ विद्यार्थ्यांचा अमृतपुत्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. इयत्ता चौथी मधील कुमारी उर्वी रोहित काकिर्डे हिला शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ‘आदर्श विद्यार्थिनीचा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. बालक वर्गाच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी यांनी आभार मानले तर मंगला बारवे यांनी सूत्रसंचालन केले.