शिवसेनेतर्फे ‘१० वी, १२ वी नंतर काय?’ या विषयावर २३ एप्रिलरोजी व्याख्यान
डोंबिवली, दि. २१
सवयंज्योती आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २३ एप्रिल रोजी १० वी आणि १२ वी नंतर काय? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखा, वर्धमान सोसायटी, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागे, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.
कार्यक्रमात सीमा वाघ यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केले आहे.
—-