सामाजिक

प्रकाश खाडिलकर यांची ‘ऑल इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; डोंबिवलीत भव्य सत्कार

प्रकाश खाडिलकर यांची ‘ऑल इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; डोंबिवलीत भव्य सत्कार

सचिन शिंदे 

डोंबिवली: ‘ऑल इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन’ (AICEBO) च्या अयोध्या येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रकाश खाडिलकर यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी तर महाराष्ट्र प्रदेशातील इतर सहकाऱ्यांची विविध महत्त्वाच्या पदांवर बिनविरोध निवड झाली.

या जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील घवघवीत यशाबद्दल ‘ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी महासंघ’ (युनिट: डोंबिवली नागरी सहकारी बँक) यांच्या वतीने त्यांचा भव्य जाहीर सत्कार कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.

हा सत्कार सोहळा शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या ‘श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी सभागृहात’ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात पार पडला.

अयोध्या येथे ‘ऑल इंडिया को-ऑप बँक एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन’चे पहिले ऐतिहासिक अधिवेशन संपन्न; राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश खाडिलकर यांची बिनविरोध निवड!

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन

या सोहळ्यास कामगार आणि सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने अनिलजी ढुमणे (अखिल भारतीय सेक्रेटरी, भारतीय मजदूर संघ व अध्यक्ष, महासंघ), अभिजीत मराठे (उपाध्यक्ष, डोंबिवली नागरी सहकारी बँक), किरण मिलगीर (प्रदेश महामंत्री, भारतीय मजदूर संघ), बाळासाहेब कांबळे (प्रदेश सरचिटणीस, राज्य सहकारी बँक कर्मचारी महासंघ), मोहनजी येणुरे (सह-संघटन मंत्री, पश्चिम क्षेत्र) यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील नव्या पर्वाचा प्रारंभ

कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “सहकारी बँकिंग क्षेत्रातील ही राष्ट्रीय स्तरावरील संघटना अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत आहे. आगामी काळात देशातील सहकारी बँकांना योग्य मार्गदर्शन करणे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाशी थेट समन्वय साधून बँका व कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग सुकर करणे, ही या संघटनेची प्रमुख ध्येये असतील.”

अशा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संघटनेच्या नेतृत्वपदावर महाराष्ट्राचे सुपुत्र प्रकाश खाडिलकर व त्यांच्या सहकाऱ्यांची निवड होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी व बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

“काय हिंदू बीफ खातात?’ ध्रुव राठी यांच्या या वादग्रस्त व्हिडिओवरून वाद वाढला, एफआयआर दाखल करण्याची मागणी तीव्र

उत्साहात सत्कार व अभिनंदन

समारंभादरम्यान उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रकाश खाडिलकर आणि महाराष्ट्र प्रदेशातील इतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावूक व उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा देण्यात आल्या.