रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे १८ ऑक्टोबरला ‘मेगा ई-कचरा संकलन मोहीम’
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे १८ ऑक्टोबरला ‘मेगा ई-कचरा संकलन मोहीम’
डोंबिवली: पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या स्वच्छतेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट’तर्फे रविवारी, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरस्तरीय ‘मेगा ई-कचरा संकलन मोहीम’ आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथील पेंढरकर कॉलेजसमोरील रोटरी भवन येथे सकाळी ९:०० ते दुपारी २:० sit दरम्यान पार पडेल.
कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील जुने, खराब झालेले आणि निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक साहित्य सुरक्षित व पर्यावरणास पूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी या मोहिमेत जमा करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ डोम्बिवली ईस्टतर्फे ‘बातमीच्या पडद्यामागची गोष्ट…’ विशेष मुलाखतीचे आयोजन
स्वीकारले जाणारे साहित्य:
जुने मोबाईल फोन्स आणि चार्जर्स
लॅपटॉप, संगणकाचे भाग आणि केबल्स (वायरी)
वापरलेल्या बॅटऱ्या
बंद पडलेली किचन अप्लायन्सेस व घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू
(टीप: फुटलेल्या काचा आणि ट्यूबलाइट्स या मोहिमेत स्वीकारल्या जाणार नाहीत.)
या मोहिमेच्या महत्त्वाविषयी सांगताना प्रकल्प प्रमुख अमित दीक्षित म्हणाले की, ई-कचऱ्याची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्यामुळे त्यातील घातक रसायने स्थानिक माती आणि पाण्यात मिसळून पर्यावरणाला मोठे नुकसान पोहोचवतात. योग्य पुनर्वापरामुळे (Recycling) या विषारी कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे शक्य होते.
कल्याण-डोंबिवली क्षेत्र स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील ई-कचरा एकत्र करून १८ ऑक्टोबर रोजी रोटरी भवन येथे आणून द्यावा, असे आवाहन रोटरी क्लबने केले आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
कार्यक्रम: मेगा ई-कचरा संकलन मोहीम
दिनांक: रविवार, १८ ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी २:००
स्थळ: रोटरी भवन, पेंढरकर कॉलेजसमोर, एमआयडीसी, डोंबिवली (पूर्व)
आयोजक: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट

