Friday, June 19, 2026
सामाजिक

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणमध्ये उद्या मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

कल्याण:

लोकसभेतील विरोधी पक्षनेते जननायक मा. श्री. राहुल गांधी जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या, शुक्रवार दिनांक १९ जून २०२६ रोजी कल्याणकरांसाठी एका विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आपले आरोग्य, आपली जबाबदारी’ हा संदेश घेऊन निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी काँग्रेस कमिटीने हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. नविन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शिबिर सर्व नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. यामध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय चाचण्या एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शिबिरामध्ये उपलब्ध असणाऱ्या मोफत सेवा व चाचण्या:

रक्तातील साखर (RBS) तपासणी

रक्तदाब (BP) तपासणी

ऑक्सिजन लेव्हल (SpO₂) तपासणी

बॉडी मास इंडेक्स (BMI) तपासणी

ईसीजी (ECG)

नेत्र तपासणी (Eye Checkup)

अस्थमा तपासणी (Asthma Checkup)

हाडांचे व सांध्यांचे उपचार (Ortho Checkup)

मेडवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या (Medwell Multispeciality Hospital) तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन व सल्ला

शिबिराची वेळ आणि ठिकाण:

दिनांक: १९ जून २०२६

वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत

स्थळ: कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, APMC मार्केट, फोर्टिस हॉस्पिटल समोर, कल्याण (पश्चिम).

कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. नविन सिंग यांनी सर्व कल्याणकर नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबीयांसह, मित्रपरिवार व शेजाऱ्यांनाही या आरोग्य शिबिराची माहिती देऊन सहभागी करून घ्यावे.