डोंबिवलीत ‘ब्राह्मण महासंघ ग्राहक पेठ एक्स्पो 2025’चे आयोजन
डोंबिवली (प्रतिनिधी) — ब्राह्मण महासंघ, डोंबिवली यांच्या विशेष आयोजनात ‘सच्च्या ग्राहक पेठ – EXPO 2025’ हे तीन दिवसांचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव येत्या 1 ते 3 ऑगस्ट 2025 दरम्यान डोंबिवलीत भरवण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांना एकत्र आणणारा हा उपक्रम ठरणार आहे एक आगळा-वेगळा अनुभव.
हा कार्यक्रम ब्राह्मण सभा हॉल, तळमजला, टिळक रोड, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
शुक्रवार, दिनांक 1 ऑगस्ट 2025: सायं. 4 ते रात्री 9
शनिवार व रविवार, दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025: सकाळी 10 ते रात्री 9
या एक्स्पोमध्ये घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, सौंदर्यप्रसाधने, कला साहित्य, हस्तकला वस्तू, गृहसजावट व आणखी अनेक उत्पादनांचे स्टॉल्स ग्राहकांसाठी खुले असतील.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून, ग्राहकांसाठी एकाच छताखाली दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण वस्तू खरेदी करण्याची उत्तम संधी निर्माण होणार आहे. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली यांच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.