मराठी गाण्याची मागणी केल्यामुळे ग्राहकाला डान्स बारमध्ये मारहाण
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ येथील आशियाना ऑर्केस्ट्रा बार मध्ये मराठी गाण्याची मागणी केल्याने एका ग्राहकाला बार कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित ग्राहकाने उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, यावर एनसी क्रमांक १७२९/२०२५ नोंदवण्यात आला आहे.
ही घटना ११ एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजता घडली. उल्हासनगरचा रहिवासी प्रदीप गावडे (२२) याच्याकडे डोंबिवलीहून काही मित्र भेटायला आले होते. त्यांनी एकत्र मद्यपान आणि डान्स पाहण्याचा निर्णय घेतला आणि ते आशियाना डान्स बारमध्ये गेले.
लाइव वीडियो
https://www.facebook.com/share/v/1A8ExBfTvJ/
प्रदीप गावडे यांच्यानुसार, बारमध्ये हिंदी गाणी सुरु होती. त्यांनी बार कर्मचाऱ्यांना मराठी गाणं लावण्याची विनंती केली, मात्र गाणं लावण्यात आलं नाही. काही वेळाने पुन्हा विनंती केल्यानंतरही मराठी गाणं न लागल्याने त्यांचा बार कर्मचाऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर बार कर्मचाऱ्यांनी प्रदीप गावडे आणि त्याच्या मित्राला मारहाण केली. एवढं होऊनही मराठी गाणं वाजवलं गेलं नाही.
या प्रकरणी सेंट्रल पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध कलम ११५(२) अंतर्गत तक्रार नोंदवली आहे. प्रदीप गावडे सध्या हाऊसकीपिंग चे काम करतात.