न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांच्या सन्मानार्थ राजभवनात विशेष स्नेहभोजनाचे आयोजन
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांच्या सन्मानार्थ राजभवनात विशेष स्नेहभोजनाचे आयोजन केल होत. यावेळी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांनी मुंबईच्या बदलेल्या रूपाविषयी आणि सुरू असलेल्या विकास कामांविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या करून माहिती घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन – कायदा हातात घेणाऱ्यांवर, पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई
तसेच मुंबई झोपडीमुक्त करून या महानगरात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देणाऱ्या योजना, देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईची आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांविषयी देखील त्यांनी जाणून घेतले.
क्रूर औरंगजेबाच्या पाशवी विचारांचे महिमामंडन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई
मुंबईत राबवलेल्या डीप क्लीन ड्राइव्ह सारख्या मोहिमेतून मुंबईची अंतर्गत स्वच्छता कशी करण्यात येत आहे तेही त्यांनी उत्सुकतेने जाणून घेतले. मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू यामुळे वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत झाली आहे तसेच मेट्रोमुळे दैनंदिन प्रवासी वाहतूक कशी सुधारत आहे त्याबद्दल देखील त्यांनी माहिती घेतली.
गेल्या 10 वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक, महाराष्ट्रात आली केवळ 9 महिन्यात
यावेळी राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, तर न्यूझीलंडच्या वतीने भारतीय वंशाचे माजी गव्हर्नर जनरल सर आनंद सत्यानंद, क्रिकेटपटू एजाज पटेल, पंतप्रधान कार्यालयाचे माध्यम अधिकारी मायकेल फोर्ब्स, अतिरिक्त मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर हेदेखील उपस्थित होते.