दिल्ली: “रेखा गुप्ता” अभाविपच्या कामातून राजकीय क्षेत्रासाठी नेतृत्व
देव, देश आणि धर्मासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंतीचे वर्ष सुरु आहे. या वर्षाचे औचित्यसाधून भाजपा केंद्रीय नेतृत्वाने राजधानी नवी दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड करून स्त्री-शक्तीचे महत्व अधोरेखित केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार
मध्यमवर्गीय रेखा गुप्ता यांची निवड करून भाजपाने आपल्याला देशभरातील पारंपरिक मतदारांकडे आपले लक्ष असल्याचे सूचित केले आहे. निवडून आलेल्या अट्ठेचाळीस आमदारातून मुख्यमंत्रीपदाची निवड करताना राजकीय शक्यता पडताळून पहाव्या लागतात. प्रादेशिक राजकारणाचे विविध पैलू तपासून घ्यावे लागतात. नवी दिल्लीतील विविध प्रांतिक संतुलन चाचपून बघावे लागते. पक्षांतर्गत सत्तेचा समतोल सांभाळावा लागतो. पंजाब, हरियाणा, पुर्वांचल, बिहार याचा दिल्लीच्या राजकारणावरील प्रभाव आणि व्यापारी लॉबी ( लाला, सेठीया समूह ) लक्षात घ्यावे लागते. भाजपा नेतृत्वाने काही निकष लावून रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा केली असणार हे निश्चित आहे.
भाजपाने आपले मुख्यमंत्री निवडीचे वेगळेपण जपले आहे. प्रवेश वर्मा यांचे नाव ज्या गतीने माध्यमातून चालवले जात होते त्यातून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार नाही हे निश्चित होते. माध्यमातून पेरली जाणाऱ्या नावांचा भाजपा दबाव घेत नाही.
धनश्री रुग्णालयात नव्या वैद्यकीय सोयीसुविधांचा समावेश, रुग्णांसाठी एक मोठे पाऊल
सत्तावीस वर्षांनी दिल्लीत भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार निवडून आले आहे. अपवाद वगळता बहुतेक सर्व आमदार हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर नियुक्त होणारा आमदार हा नवा, पहिल्यांदा निवडून येणारा हे स्वाभाविक होते. त्यातून महिला आमदार निवडून भाजपाने देशभरातील महिलांना एक विशेष संदेश दिला आहे. महिलांच्या राजकीय आरक्षणात भाजपाने यातून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
भारतीय मजदूर संघाच्या उपाध्यक्षपदी सचिन मेंगाळे यांची निवड
दिल्ली राजधानी असल्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कारभाराकडे असेल. आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांच्या सलग दहा वर्षाच्या कारभाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या रेखा गुप्ता यांच्या कामाकडे बघितले जाणार आहे. रेखा गुप्ता यांना पहिल्या दिवसापासून आश्वासनांच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. नोकरशाहीच्या सवयी बदलून त्यांच्याकडून वेगाने काम करून घ्यावे लागणार आहे. नव्याची नवलाई फार काळ टिकणार नाही. रेखा गुप्ता यांना आपली निवड योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी फारसा अवधी मिळणार नाही. अल्पवधीत रेखा गुप्ता यांना विरोधक आणि समर्थक यांना आपली चुणूक दाखवावी लागेल.
डोंबिवली: “नानी पालखीवाला एक सहृदयी सुसंस्कृत वकील’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन
नगरसेवक, महापौर म्हणून काम केलेल्या रेखा गुप्ता यांना प्रशासनाचा अनुभव आहे. दिल्लीतल्या प्रश्नांची जाण आहे. रेखा गुप्ता या विद्यार्थी चळवळीतील आहेत. दिल्लीतल्या “छात्र राजनीती” चा अनुभव रेखा गुप्ता यांना आहे. सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिलेल्या रेखा गुप्ता यांना भाजपा ही “पार्टी विथ डिफरन्ट” याचा अनुभव आपल्या कामातून मतदारांना दयायचा आहे. समर्थक मतदारांचा विश्वास आपल्याला कामातून वाढवून दिल्लीत भाजपाच्या सत्तेचा पाया मजबूत करण्याची संधी रेखा गुप्ता यांना मिळालेली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले ‘विश्व मराठी संमेलन २०२५’
रेखा गुप्ता या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित होत्या. दिल्ली विद्यापीठ ( DUSU ) निवडणूक त्यावेळी रेखा गुप्ता यांनी अभाविपच्या उमेदवार म्हणून लढली होती. “डूसू” प्रेसिडेंट म्हणून निवडून येणे हे दिल्लीत महत्वाचे मानले जाते. छात्रनेता ही ओळख मिळते. राजकीय पक्ष यांची आवर्जून नोंद घेतात. डुसू प्रेसिडेंट सक्रिय राजकारणात स्वाभाविकपणे येतो. रेखा गुप्ता यांच्या निवडीमुळे अभाविपच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. अभाविपच्या कामातून राजकीय क्षेत्रासाठी नेतृत्व तयार होते हे रेखा गुप्ता यांच्या निवडीने सिद्ध झाले आहे.
कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर!
सुषमा स्वराज, शीला दीक्षित, अतिषी आणि आता रेखा गुप्ता हे दिल्लीतील महिलाराज आहे. दिल्ली विद्यापीठ अध्यक्ष, नगरसेवक आणि आता मुख्यमंत्री अशी वाटचाल करणाऱ्या रेखा गुप्ता यांना राजधानी दिल्लीचे प्रश्न सोडवण्यासाठी शुभेच्छा !
साभार – मकरंद मुळे, ठाणे