मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय लिपींवर आधारित ‘अक्षरभारती’ पुस्तकाचे प्रकाशन
अक्षर कलेच्या सेवेमार्फत लिपीचे आणि संस्कृतीचे जतन!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय लिपींवर आधारित ‘अक्षरभारती’ पुस्तकाचे प्रकाशन आणि ‘सुलेखन प्रदर्शना’चे उदघाटन आज जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे पार पडले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षर कला जोपासणार्या अच्युत पालव यांचे, त्यांना भारत सरकारमार्फत पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी त्यांनी अक्षर कलेला सर्वांपर्यंत पोहोचवून या कलेच्या सेवेमार्फत लिपीचे आणि संस्कृतीचे जतन करण्याचे महद्कार्य करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे देखील व्यक्त केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अक्षरभारती’ पुस्तकाच्या माध्यमातून विविध अक्षर आणि लिपी यांचे सुंदर स्वरूप आपल्यापुढे मांडण्यात आले असल्याचे नमूद केले. अच्युत पालव हे अनेक भाषा-लिपी जोपासून सुंदर पद्धतीने सर्वांपर्यंत पोचवण्याचे महद्कार्य करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी सुलेखक अच्युत पालव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.