जोरदार थाटामाटात मानपाडा पोलीस स्टेशनच्या गणेश विसर्जन
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस स्हटेशन मधले हवालदार, थाने अंमलदार पासून सर्व सब-इन्स्पेक्टर, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकही याच ड्रेस कोडमध्ये मस्तीत एकत्रपणे नाचत होते.
या वर्षी अनंत चतुर्थी म्हणजेच गणेश विसर्जनाची तारीख १५ सप्टेंबर होती. मात्र डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याने आयोजित केलेल्या गणेशोत्सवाचे विसर्जन काल गुरुवार म्हणजेच १९ सप्टेंबरला करण्यात आले.
ही परंपरेपासून थोडी वेगळी गोष्ट आहे, कारण हिंदू धर्मात असे मानले जाते की गणेश स्थापना जशी ठरलेली असते, तशीच गणेश विसर्जनाची तारीखही ठरलेली असते आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी सर्व गणपतींचे विसर्जन केले जाते.
पण मानपाडा पोलीस ठाण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे विसर्जन अनंत चतुर्थीच्या चार दिवसांनी, काल गुरुवारी करण्यात आले.
या घटनेवर स्थानिक नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया आहेत.
मात्र मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना अनंत चतुर्थीच्या चार दिवसांनंतर केलेल्या गणेश विसर्जनात काही गैर वाटत नाही.
संपूर्ण परिसरात पोलीस सतर्कतेने तैनात असतात, त्यामुळे त्यांना स्वतःच्या गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र वेळ काढणे नागरिकांवर अन्याय होईल.
यावर्षी अनंत चतुर्थीनंतर लगेचच ईदचा सण होता, ज्यामुळे पोलिस बंदोबस्तात असल्यामुळे वेळ मिळाली नाही. आणी म्हणून गणेश विसर्जन शक्य झाले नाही.
या सणांनंतर दोन दिवसांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी रिलॅक्स झाले होते, म्हणूनच काल गुरुवारी सायंकाळी मानपाडा पोलीस ठाण्यातील गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गणेश विसर्जनाची तारीख अनंत चतुर्थीपर्यंतच असते, हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु त्या काळात पोलीस ठाण्यातील हवालदारांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांना विश्रांती घेण्याची उसंत मिळत नाही.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याच्या मते, गणेश पूजन हे आमची श्रद्धा आहे. गणेशोत्सवात सर्व अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण श्रध्देने सक्रिय सहभाग घेतात. म्हणुन विसर्जनाचा वेळ सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार ठेवण्यात येत.
विसर्जन संपूर्ण जल्लोषात करण्यात आले, बँडबाजासह धूमधडाक्यात झाले.
गुरुवारी संध्याकाळी ६:०० ते ८:०० वाजेपर्यंत मानपाडा पोलीस ठाण्यात उत्साहाचे वातावरण होत.
संपूर्ण पोलीस ठाण्यातील हवालदारांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा एकच ड्रेस कोड होता – पोपटी कुर्ता, पांढरी पायजमा आणि डोक्यावर फेटा. सर्व जण आनंदात होते, रिलॅक्स होते,
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस स्हटेशन मधले हवालदार, थाने अंमलदार पासून सर्व सब-इन्स्पेक्टर, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकही याच ड्रेस कोडमध्ये मस्तीत एकत्रपणे नाचत होते.