‘वयम्’ चळवळीच्या’ मिलिंद थत्ते यांचे व्याख्यान
डोंबिवली दि.२६ :- पर्यावरण दक्षता मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या २९ ऑक्टोबररोजी ‘वयम्’ चळवळीचे प्रणेते मिलिंद थत्ते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता श्री गणेश मंदिर संस्थान, वक्रतुंड सभागृह, डोंबिवली पूर्व येथे होणार असून ‘वनातल्या जनांच्या मनातल्या गोष्टी’ या विषयावर थत्ते बोलणार आहेत.