मुख्यमंत्री शिंदे गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई, दि.१८ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरा हे उद्या (गुरुवारी) शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
नवी मुंबईत आता दिवसातून एकदाच सलग सहा ते सात तास पाणीपुरवठा
बरोरा हे आधी राष्ट्रवादीचेच आमदार होते. परंतु २०१९ मध्ये बरोरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधन बांधले. त्याच वेळी राष्ट्रवादीने शहापूर मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या दौलत दरोडा यांना उमेदवारी दिली.
कल्याण रेल्वे स्थानकात चार हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई, १६ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल
दौलत दरोडा यांनी पांडुरंग बरोरा यांचा पराभव केला होता. आता दौलत दरोडा अजित पवार यांच्या गटात गेल्याने पांडुरंग बरोरा यांची कोंडी झाली. त्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.