ठळक बातम्या

‘म्हाडा’ कोकण मंडळाच्या सलग दुसऱ्या सोडतीला अल्प प्रतिसाद

अनामत रक्कमेसह फक्त ३ हजार ८४० अर्ज सादर

मुंबई दि.०६ :- ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाने २०२३ मध्ये सलग दुसरी सोडत काढली असून या सोडतीला सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत अनामत रक्कमेसह केवळ ३ हजार ८४० अर्ज सादर झाले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेट

अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू होऊन आता वीस दिवस झाले असून अर्जविक्री-स्वीकृतीसाठी केवळ दहा दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत ५३११ घरांसाठी केवळ ८ हजार २९३ इच्छुकांनी अर्ज भरले त्यातील केवळ ३ हजार ८४० अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *