एक हजार मेगावॉट वीज मुंबईत आणणाऱ्या खारघर-विक्रोळी पारेषण वाहिनीची उभारणी पूर्ण
मुंबई दि.०३ :- मुंबईसाठीची एक हजार मेगावॉट वीज मुंबईत आणणाऱ्या खारघर-विक्रोळी पारेषण वाहिनीची (केव्हीटीएल) उभारणी पूर्ण झाली आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून हा प्रकल्प रखडला होता. मुंबईत वीज वाहून आणणाऱ्या वाहिन्या मर्यादित असून त्यांची एकूण क्षमता ३२०० मेगावॉटदरम्यान आहे.
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन
यंदाच्या उन्हाळ्यात वीजेच्या मागणीने ४ हजार मेगावॉटचा टप्पा गाठला होता. खारघर ते विक्रोळी ४०० केव्ही क्षमतेची नवी वाहिनी टाटा पॉवरकडून टाकली जाणार होती. मात्र त्यांनी ते काम पूर्ण न केल्याने २०२१मध्ये हे काम अदानी ट्रान्समिशनकडे सोपविण्यात आले. अदानी ट्रान्समिशनच्या अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडने नियोजित वेळेत या वाहिनीसह सर्व संबंधित काम पूर्ण केले.
निर्मल युथ फाउंडेशनतर्फे गणेश विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन; १७ हजार किलो निर्माल्य जमा
तळेगाव-कळवा ही ४०० केव्हीची वाहिनी खारघर-विक्रोळी वाहिनीला जोडली जाणार असून सध्या कळव्याला जाणारी वीज आता विक्रोळीत येणार आहे.
विक्रोळीत येणारी वीज सध्याच्या ट्रॉम्बे-सॉलसेट या २२० केव्ही क्षमतेच्या (जवळपास ५०० मेगावॉट क्षमता) वाहिनीद्वारे मुंबईत आणली जाणार आहे. त्यामुळे कळवा येथील केंद्रावर असलेला ४०० केव्ही क्षमतेच्या चार वाहिन्यांचा भार काही प्रमाणात हलका होणार आहे.