* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन

विविध देशांचा ‘वर्ल्ड ट्रेड एक्स्पो’ मध्ये सहभाग

मुंबई दि.०३ :- राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील जागतिक व्यापार केंद्र येथे आज दोन दिवसांच्या चौथ्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन झाले. वल्र्ड ट्रेड सेंटर मुंबई व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना राज्यपाल बैस म्हणाले, भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी – २० शिखर परिषदेच्या यशानंतर भारताचे जागतिक पटलावर महत्व अधोरेखित झाले आहे. अनेक देश आज व्यापार विस्तारासाठी चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताकडे पाहत आहेत.

मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना आदेश

महाराष्ट्र उद्योग व गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वात आकर्षक राज्य असून राज्यात पर्यटन विकासाच्या अनेक संधी आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध देशांना आपल्या देशातील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाच्या संधी दाखविण्याची तसेच राज्यातील व्यापाराच्या संभावना जाणून घेण्याची संधी मिळेल, असेही राज्यपाल बैस यांनी सांगितले. जागतिक व्यापार प्रदर्शनात ३० देशांचा सहभाग असून देशातील पाच राज्ये देखील यात सहभागी झाली आहेत, अशी माहिती ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे व मुंबईच्या जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष डॉ विजय कलंत्री यांनी यावेळी दिली.

डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२३सह चार नव्या चार ग्रंथाचे प्रकाशन

या प्रदर्शनात व्यापार – व्यापार सहकार्य व व्यापार – शासन सहकार्य या विषयावर सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. प्रयागराजच्या खासदार रिटा बहुगुणा-जोशी, ब्रिटनचे मुंबईतील उप उच्चायुक्त हरजिंदर कांग, जागतिक व्यापार केंद्राचे उपाध्यक्ष कॅप्टन सोमेश बत्रा, केंद्राच्या कार्यकारी संचालिका रुपा नाईक, अनेक देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *