दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाचे नवे धोरण जाहीर
मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळ सात प्रकल्प पूर्ण करणार
मुंबई दि.२७ :-दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने नव्याने धोरण जाहीर केले असून आता या जुन्या इमारतींच्या रखडलेल्या प्रकल्पांपैकी सात प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अखत्यारीतील मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळ पूर्ण करणार आहे.
ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी
या सात प्रकल्पात पानवाला चाळ क्र. २ व ३, तारानाथ निवास (लालबाग), आर. के. बिल्डिंग क्रमांक १ व २, स्वामी समर्थ कृपा बिल्डिंग (दादर पश्चिम), नानाभाई चाळ (परळ व्हिलेज), जसोदा सहकारी गृहनिर्माण संस्था (माहिम) आणि म्हात्रे बिल्डिंग (गिरगाव) या इमारतींचा समावेश आहे. या सात प्रकल्पांचे भूखंड संपादित करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत.
‘उबाठा’ गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
त्यानुसार रीतसर निविदा मागवून म्हाडामार्फत या रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. शहरात सध्या १३ हजार ३०९ उपकरप्राप्त इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत राज्य शासनाने आठ आमदारांची समिती नेमली होती. या समितीने दिलेला अहवाल राज्य शासनाने स्वीकारला असून त्यानुसार नवे धोरण जारी केले आहे. या नव्या धोरणाअंतर्गत म्हाडा कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.