Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

मुंबई, ठाणे परिसरात जोरदार पाऊस

मुंबई, दि. ३०
मुंबई आणि ठाणे परिसरात आज जोरदार पाऊस झाला. सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. ठाणे, दिवा, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली.
अंबरनाथ, बदलापूरमध्ये गुरुवारी रात्री विश्रांती घेतल्यानंतर शु्क्रवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला.

मुंबईतील पावसामुळे शुक्रवारी सकाळी मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशीराने सुरु होती.
पावसाचा जोर ओसरला जरी असला तरी पावसाची संततधार सरुच आहे.

लाल बहादूर शास्त्री मार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. पश्चिम द्रुतगती मार्गावर वांद्रे ते अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

अंधेरी सबवेत तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे हा सबवे वाहने व नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. अर्ध्या तासाने पाणी ओसरल्यानंतर अंधेरी सबवे वाहतूकीसाठी पुन्हा सुरु करण्यात आला.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *