ठळक बातम्या

महापालिका अधिकारी मारहाण प्रकरणी आमदार अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल – चार जणांना अटक

मुंबई, दि. २७
बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘एच’ पूर्व कार्यालयातील अधिका-याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून झालेल्या मारहाण प्रकरणी वाकोला पोलिसांनी उबाठा गटाचे आमदार, विभाग प्रमुख ॲड. अनिल परब यांच्यासह २० हून अधिक कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून यात माजी नगरसेवक सदा परब, हाजी हलीम खान, शाखाप्रमुख संतोष कदम, उदय दळवी यांचा समावेश आहे.

महापालिका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इतर फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *