हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार
मुंबई, दि. २७
हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘स्मृती चिन्ह’ आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळा ‘सेव कल्चर सेव इंडिया’ फाऊंडेशनतर्फे उत्तर प्रदेश राज्यातील ‘ग्रेटर नोएडा’ येथील गौतमबुद्ध विद्यापिठात आयोजित करण्यात आला होता. ‘सेव कल्चर सेव इंडिया’ फाऊंडेशनचे संस्थापक तथा भारताचे माहिती आयुक्त उदय माहूरकर हे उपस्थित होते.
राष्ट्र आणि भारतीय संस्कृतीवर कुदृष्टी ठेवणार्यांच्या विरोधात सातत्याने संवैधानिक मार्गाने संघर्ष करणे, चित्रकार एम्.एफ्. हुसेन आणि डॉ. झाकीर नाईक यांचे राष्ट्र तथा समाज विरोधी स्वरूप लोकांसमोर आणणे, तसेच भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ पुस्तकांचे लेखन करणे यांसाठी हा पुरस्कार शिंदे यांना देण्यात आला आहे.
हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार
हिंदू फ्रंट फॉर जस्टीसचे प्रवक्ते तथा सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, चित्रपट निर्माते प्रवीण चतुर्वेदी, पत्रकार स्वाती गोयल शर्मा, पत्रकार प्रदीप भंडारी, वैशाली शाह, संजीव नेवर आणि मनीष बर्दिया यांनाही ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकृत साहित्य निर्मिती करून देशातील युवापिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्यांना उघडे पाडण्यासाठी ‘कृपया ध्यान दे’ या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
——
