ठळक बातम्या

राज्यभरातील १०७ महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द, महारेराचा निर्णय

मुंबई, दि. २५
राज्यभरातील १०७ महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे.
या प्रकल्पांची यादी महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी ७ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

जुन्या ८८ प्रकल्पांबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी १७ जूनपर्यंत असलेली मुदत ७ जुलै अशी करण्यात आली आहे. नवीन १९ प्रकल्पांबाबत ७ जुलैपर्यंत आक्षेप नोंदविता येतील असे महारेराने जाहीर केले आहे.

नवीन गृहप्रकल्पांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. तर विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण करणेही विकासकांसाठी बंधनकारक आहे. जे विकासक वेळेत प्रकल्प पूर्ण करत नाहीत किंवा नोंदणीची मुदत संपते त्या प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याची तरतूद रेरा कायद्यात आहे.

आता महारेराने १० फेब्रुवारी रोजी एका परिपत्रकाद्वारे अव्यहार्य आणि कधीही पूर्ण होऊ न शकणाऱ्या प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *