Thursday, August 20, 2026
Latest:
राजकीय

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा उद्या सांगली येथे सत्कार

मुंबई, दि. २४
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या (रविवारी) एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे सिद्धरामय्या यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.‌

सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. प्रभारी व कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *