Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

बकरी ईदनिमित्त अनधिकृत आयात, कत्तल याबाबत तक्रार करण्यासाठी महापालिकेची सुविधा

मुंबई, दि. २२
बकरी ईदनिमित्त होणारी जनावरांची अनधिकृत आयात, कत्तल व मांस विक्रीबाबत नागरिकांना ९९३०५०१२९३ या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेने हा मदत क्रमांक सुरू केला असून तो येत्या ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

धार्मिक पशुवध धोरणानुसार बकरी ईदनिमित्त पशुवधासाठी परवानगी देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध केवळ देवनार पशुवधगृहातच करणे बंधनकारक आहे. या कालावधीत जनावरांची अनधिकृत आयात, कत्तल व मांस विक्री केली जाते.

नागरिकांना याबाबत तक्रार करणे सोपे व्हावे आणि नियमबाह्य घटनांना आळा बसावा यासाठी हा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे.
——