बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
मुंबई, दि. १३
बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली.
त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यसचिवांना हे आदेश दिले.
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे.
बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकताहेत की नाही ते तपासावे. बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास अशांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता काटेकोर कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
—–
