ठळक बातम्या

मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण

मॉरिशस दि.२५ :- मॉरिशसमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या २८ एप्रिल रोजी मॉरिशसमध्ये अनावरण करण्यात येणार आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

आयसीसी जागतिक चषक सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

मॉरिशसमध्ये सुमारे ७५ हजार मराठी बांधव असून, ते पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागांतील आहेत. या मंडळींनी मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या सुमारे ५४ संघटना असून, या सर्व संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन केले आहे.
या फेडरेशनची स्थापना १ मे, १९६० रोजी झाली. शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे होतात.

कुलकर्णी परिवारातर्फे २९ एप्रिलरोजी ‘गझलभान’ कार्यक्रमाचे आयोजन

येथे एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले असून, त्याच्या विस्तारासंदर्भातील काही मागण्या आहेत. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *