खारघर दूर्घटना प्रकरणी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेसच्या पत्रकार परिषद- अतुल लोंढे
मुंबई दि.२१ :- खारघर येथील दूर्घनेतील सत्य जनतेसमोर यावे यासाठी काँग्रेस पक्षातर्फे २४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे अहमदनगर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेड येथे तसेच अन्य नेते त्या त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात १४ लोकांचा मृत्यू हे शिंदे-फडणवीसांच्या निर्लज्ज सरकारचे बळी आहेत.
सरकार आजही या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहे. खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे. सरकारने खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही लोंढे यांनी केली.