राजकीय

कोरोना काळात तर एवढी माणसं गेली त्या.. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा..” राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला ‘

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला. हा सोहळा नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात २० लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात आलेल्या १४ श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. यानंतर आता यावरून राजकारण रंगलं आहे.

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यानंतरच्या दुर्दैवी घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती

या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. याशिवाय, ‘सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे खारघर दुर्घटनेच्या ठिकाणी का गेले नाही? आत्ता कुठे आहेत ते. तर या प्रकरणी जर का कोणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली असेल, तर त्यामध्ये चुकीचे काय आहे आणि मागणी करण्यापेक्षा त्यांनी स्वतः या प्रकरणाची जवाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहर विकासावर आपल्या कारकीर्दीची छाप सोडावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी खारघर दुर्घटनेबद्दल राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावेळी उत्तर देताना “तो एक अपघात होता. त्याचं राजकारण करु नये. अपघाताचं काय राजकारण करायचं? तसंच म्हटलं तर मग कोरोनामध्ये एवढी माणसं गेली. त्या प्रकरणातसुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल”, असे राज ठाकरे म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *