मेट्रो रेल्वे प्रकल्प- राज्य सरकारकडून ठराविक रक्कम दुय्यम कर्ज म्हणून ‘एमएमआरडीए’ ला वितरित
मुंबई दि.२३ :- मेट्रो प्रकल्पांसाठी लागणाऱ्या खर्चातील काही ठराविक रक्कम राज्य सरकारकडून दुय्यम कर्जाच्या माध्यमातून ‘एमएमआरडीए’ला देण्यात येणार आहे.
टप्प्याटप्प्याने हे दुय्यम कर्ज दिले जात असून शून्य व्याजदराने मिळालेल्या या कर्जाची परतफेड प्राधिकरणाला करावी लागणार आहे.
मुंबईतील तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांत गुढीपाडव्याला १ हजार ३१९ नव्या वाहनांची नोंद
राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून विविध मेट्रो मार्गांसाठी १६६ कोटी रुपयांचे दुय्यम कर्ज वितरित केले आहे. ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’साठी ३० कोटी रुपये, ‘अंधेरी पश्चिम – मंडाळे मेट्रो २ ब’साठी २० कोटी रुपये देण्यात आले आहेत.
ठाकरे, फडणवीस यांची ‘दिल दोस्ती’ आणि बासनात गुंडाळलेली प्रकरणे
‘वडाळा – कासारवडवली मेट्रो ४’साठी ३२ कोटी रुपये, ‘ठाणे-कल्याण मेट्रो ५’साठी १४ कोटी रुपये, ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’साठी १८ कोटी रुपये, ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’साठी ३८ कोटी रुपये आणि ‘दहिसर – मीरारोड मेट्रो ९’साठी १४ कोटी रुपये इतके दुय्यम कर्ज वितरित करण्यात आले.
